TIMES OF INDIA वृत्तपत्र समूहाकडून अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेला एक्सलंट एज्युकेशन ब्रँड पुरस्कार
काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.शिक्षण मंत्री लोकनेते मान. ना. श्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखालील अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेला १९७८ पासून आजतागायत ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण योगदानाबद्दल Times of India वृत्तपत्र समूहाकडून '' Excellent Education Brand 2024 '' हा मानाचा पुरस्कार हिंदी चित्रपट अभिनेते मान.श्री दिनो मोरिया (राज फेम)व नाशिकचे पोलीस आयुक्त मान. श्री संदीप कर्णिक यांच्या हस्ते संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयू देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी मान.श्री अनिल शिंदे यांना नाशिक येथील शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.एम.ए.व्यंकटेश, डायरेक्टर अकॅडेमिक डॉ. जे. बी. गुरव, एमबीए महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ.बी.एम.लोंढे, मॉडेल स्कूलच्या प्राचार्या श्रीमती.शितल गायकवाड, तंत्रनिकेतनचे उपप्राचार्य श्री.जी.बी.काळे व कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.वाघ उपस्थित होते.
हार्दिक अभिनंदन !